अच्छा, तो  हम चलते हैं!

पीटीआय
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

बार्सिलोना - व्यावसायिक फुटबॉलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मोठी घडामोड आता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. ब्राझीलचा सुपरस्टार आणि बार्सिलोनातील मेस्सीचा साथीदार नेमार आता बार्सिलोना सोडणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. बार्सिलोनाच्या सराव शिबिरात तो दाखल झाला; पण काही वेळातच त्याने सहकाऱ्यांचा निरोप घेतला. त्यामुळे आता मेस्सी-सॉरेझ-नेमार (एमएसएन) या जोडीतील ‘एन’ तुटणार हे स्पष्ट होत आहे.

याच महिन्यातून व्यावसायिक फुटबॉलला प्रारंभ होत आहे. प्रत्येक संघ तयारीत गुंतला आहे. बार्सिलोनानेही सराव सुरु केला आहे. आज नेमार या शिबारात आला. आपल्या (माजी) सहकाऱ्यांना बाय बाय केले आणि मिनिटभरात तो तेथून निघूनही गेला. बार्सिलोनाच्या प्रशिक्षकांनी त्याला सरावासाठी परवानगी दिली नाही. अगोदर तुझ्या भवितव्याचा प्रश्‍न सोडव, असे त्यांनी सांगितले.

पॅरिस सेंट जर्मेनने (पीएसजी) नेमारसाठी मोठी ऑफर दिली आहे. ती प्रत्यक्षात आली तर नेमार फुटबॉलविश्‍वातील सध्याचा सर्वात महागडा खेळाडू ठरेल, असे बोलले जात आहे. 

तांत्रिक अडचण
पीएसजी हा पॅरिसमधील क्‍लब आहे. या क्‍लबने नेमारसाठी २२ कोटी २० लाख युरोजी ऑफर दिली आहे. वास्तविक नेमार २०२१ पर्यंत बार्सिलोनाशी करारबद्ध आहे. हा करार मध्येच मोडण्यामध्ये नेमारसाठी ‘बायआउट’ अट अडचणीची ठरू शकते.