‘ट्रॉफी’चा भारतातील प्रवास १७ ऑगस्टपासून

पीटीआय
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघास दिल्या जाणारी ‘ट्रॉफी’ पुढील आठवड्यात भारतात आणण्यात येणार असून, देशातील तिच्या प्रवासास १७ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथून होईल.

विश्‍वकरंडक स्पर्धेची ‘ट्रॉफी’ स्पर्धा होणाऱ्या सहा केंद्रांचा प्रवास करणार आहे. १७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर अशा एकूण ४० दिवसांच्या प्रवासात एकूण ९ हजार कि.मी. अंतराचा प्रवास केला जाईल. 

यजमान भारत आपले सामने नवी दिल्ली येथे खेळणार असून, येथूनच या ट्रॉफीच्या प्रवासास सुरवात होईल. ‘ट्रॉफी’ प्रवासाबाबत बोलताना संयोजन समितीचे आणि भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले, ‘‘या ट्रॉफीच्या प्रवासाचा अनुभव वेगळाच असेल. स्पर्धेच्या प्रचारासाठीचा हा अखेरचा टप्पा असून, तो सर्वांत महत्वाचा असेल. त्यामुळे देशातील फुटबॉल चाहत्यांना विश्‍वकरंडक ट्रॉफी जवळून बघता येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या वेळी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.’’