‘हॉकी लीगमुळे परदेशी संघांची भीती दूर होते’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - हॉकी लीगमुळे देशातील नवोदितांना मिळणाऱ्या संधीने परदेशातील अव्वल संघांची भीती पळून जाते, असे मत भारताचा हरहुन्नरी हॉकीपटू हरमनप्रीत सिंग याने व्यक्त केले. संघाच्या रचनेमुळे भारताच्या नवोदितांना परदेशी खेळाडूंसह एकत्र खेळण्याचीही संधी मिळत आहे.

नवी दिल्ली - हॉकी लीगमुळे देशातील नवोदितांना मिळणाऱ्या संधीने परदेशातील अव्वल संघांची भीती पळून जाते, असे मत भारताचा हरहुन्नरी हॉकीपटू हरमनप्रीत सिंग याने व्यक्त केले. संघाच्या रचनेमुळे भारताच्या नवोदितांना परदेशी खेळाडूंसह एकत्र खेळण्याचीही संधी मिळत आहे.

हा २१ वर्षीय ड्रॅगफ्लिकर व बचाव खेळाडू दबंग मुंबई संघातून खेळत आहे. या संघात २०१२ च्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीतील फ्लोरीयन फुच्स, ऑस्ट्रेलियाच्या किएरॅन गोवर्स व आयर्लंडच्या डेव्हिड हार्ट यांचा समावेश आहे. अशा दिग्गज खेळाडूंसह एकत्रितपणे खेळल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना कोणतीच भीती राहत नाही, असे त्याचे म्हणणे आहे.

सुरवातीला या खेळाडूंसह खेळताना काहीसे दडपण असायचे; परंतु फ्लोरीयनसारख्या खेळाडूबरोबर सातत्याने चर्चा केल्यामुळे दडपण दूर होते आणि आत्मविश्‍वास तयार होतो. परदेशी खेळाडू चांगले प्रोत्साहन देत असतात. होत असलेल्या चुका ते सुधारत असतात. माझ्यासाठी हा अनुभव फार मोठा असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मैदानात उतरल्यावर मी आत्मविश्‍वासाने खेळू शकतो, असे त्याने सांगितले. लखनौ येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर विश्‍वकरंडक स्पर्धेत मला या आत्मविश्‍वासाचा फायदा झाला आणि मी खेळावर पहिल्या मिनिटापासून लक्ष केंद्रित करू शकलो, असे त्याने आवर्जून सांगितले.

तो पुढे म्हणतो की, प्रत्येक परदेशी खेळाडूची स्वतःची वेगवेगळी स्टाईल असते. हॉकी लीगमध्ये नव्या जोड्या तयार होतात आणि त्याचा फायदा त्यांना निश्‍चितच आंतरराष्ट्रीय स्पर्धांत होत असतो. हॉकी लीगमध्ये वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध प्रशिक्षकही वेगवेगळे डावपेच तयार करत असतात. अशा सर्व अनुभवाचा फायदा आम्ही ज्युनियर विश्‍वकरंडक स्पर्धेत करून घेतला.

यंदाचा हॉकी लीग २१ जानेवारीपासून मुंबईत सुरू होत आहे. भारताच्या ज्युनियर संघाने नुकत्याच मिळवलेल्या यशामुळे यंदाची ही लीग अधिक चुरशीची होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

क्रीडा

नवी दिल्ली - भारताचा शैलीदार फलंदाज युवराज सिंह याला गेल्या काही सामन्यांत...

सोमवार, 26 जून 2017

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत शानदार सुरुवात करणारा भारत अखेर पाकिस्तानकडून अंतिम सामन्यात हरला. कर्णधार विराट कोहलीला मैदानावर मोठे...

सोमवार, 26 जून 2017

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार "विराट कोहली' आता सोशल मीडियावरही अतिशय...

सोमवार, 26 जून 2017