फक्त पाकला हरविणे पुरेसे नाही - ऑल्टमन्स

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई/लंडन - पाकिस्तानला हरवणेच पुरेसे नाही, हे भारतीय हॉकीपटूंना समजण्याची गरज आहे. भारतीय जिंकण्यासाठी उत्सुकच नव्हते, अशा शब्दात भारतीय हॉकी मार्गदर्शक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी खेळाडूंवरील राग व्यक्त केला. त्याच वेळी त्यांनी सहावा क्रमांक आम्हाला नको होता, असेच निराशेने सांगितले.

वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्याच्या स्पर्धेत भारतास एकतर्फी वर्चस्व राखल्यानंतरही कॅनडाविरुद्ध हार पत्करावी लागली. याबाबत ऑल्टमन्स म्हणाले, भारतीयांनी चेंडूवर हुकमत राखली. सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखले. हे काही मी सांगण्याची गरज नाही. कॅनडा विजय मिळवण्याच्या जिद्दीने मैदानात उतरले होते, तर आमच्या संघात नेमकी याचीच उणीव होती, असे ते म्हणाले.

भारताने या स्पर्धेत दोन विजय दुबळ्या पाकिस्तानविरुद्ध; तर प्रत्येकी एक विजय स्कॉटलंड आणि कॅनडाविरुद्ध होता. जोपर्यंत आपण नेदरलॅंड्‌स, मलेशियासारख्या संघांना हरवत नाही, तोपर्यंत काहीही साध्य होणार नाही. पाकविरुद्धचे विजय हे काही कामगिरीचे मूल्यमापन होत नाहीत. पाकला पराजित केल्यावर आपण महत्त्वाची लढत जिंकली, ही मानसिकता बदलायला हवी, सध्याची हॉकी बघितली तर आपण मलेशिया, कॅनडा, इंग्लंड यांसारख्या संघांना हरवण्याची गरज आहे, असे ऑल्टमन्स यांनी सांगितले.