हॉकी संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये तीन भारतीय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - भारतीय हॉकी संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदी रोएलॅंट ऑल्टमन्स असले, तरी त्यांनी सपोर्ट स्टाफमध्ये जास्तीत जास्त भारतीयांना पसंती देण्याचे ठरवले आहे. त्याचा एक भाग म्हणून अर्जुन हलाप्पा, जुगराज सिंग यांना सहायक म्हणून स्थान मिळाले असून, गोलरक्षक मार्गदर्शकाची निवडही अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.

बंगळूरला सुरू असलेल्या भारतीय हॉकी संघाच्या सराव शिबिरात अर्जुन हलाप्पा यांनी मार्गदर्शन करण्यास सुरवातही केली आहे. जुगराज सिंग काही दिवसांत दाखल होतील. ऑल्टमन्स हेच हलाप्पा यांच्यासाठी आग्रही होते. अजूनही खेळत असलो, तरी मार्गदर्शनाकडेच अधिक कल असेल असे त्याने मान्य केले. त्यामुळेच ऑल्टमन्स यांची ऑफर आपण तातडीने स्वीकारली असे त्याने सांगितले. या दोघांच्या अनुभवाचा संघास फायदाच होणार असल्याचे मत ऑल्टमन्स यांनी व्यक्त केले.

तुषार खांडकर दूर
काही महिने भारतीय हॉकी संघाचे सहायक मार्गदर्शक असलेल्या तुषार खांडकर यांनी राजीनामा दिल्याचे समजते. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यासाठी खांडकर यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. खांडकर काही महिन्यांच्या ब्रेकनंतर संघासोबत येतील, अशी आशा ऑल्टमन्स बाळगून आहेत.