स्वप्नील कुसाळे याला नेमबाजीत कांस्यपदक

राजू पाटील
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

राशिवडे बुद्रुक - राधानगरी तालुक्‍यातील छोट्याशा; पण राज्यात स्वच्छतेत पहिल्या आलेल्या कांबळवाडीने पुन्हा आनंदोत्सव साजरा केला. काल झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत गावच्या स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत कांस्यपदक मिळवले. प्राथमिक शिक्षकाच्या मुलाची भरारी निश्‍चितच आवाक्‍याबाहेरची आहे. त्याच्यासाठी शिक्षक असलेल्या सुरेश कुसाळे यांची धडपड कारणी लागली.

शिक्षकाच्या घराला यशाचे तोरण लागले. स्वप्नीलचे आता ऑिलंपिक हे स्वप्न आहे. स्वप्नीलच्या बाबतीतही तसेच घडत होते. त्याला शाळेतील अभ्यासा इतकाच खेळात रस होता, धडपड होती. तीच नेमकी वडील सुरेश यांनी हेरली आणि त्याला हवे तसे वळण देण्याचा प्रयत्न सुरू केला. शालेय स्तरापासून त्याला नेमबाजीसाठी पाठबळ दिले. कोल्हापुरात नामवंत नेमबाज असलेल्यांकडे खेटे घातले. हा मार्ग खडतर असल्याचे अनेकांनी सांगितले तरी जिद्द सोडली नाही. पगारातून संसारासाठी थोडे राखून सगळे पैसे स्वप्नीलचे स्वप्न साकारण्यासाठीच ओतले.

कुवतीबाहेर किंमत असलेल्या रायफल्स त्याने त्याला दिल्या, पण पाठराखण रोडली नाही. गेल्या महिन्यात मुलाची राष्ट्रकुलसाठी निवड झाली तेव्हाही त्यांची धावपळ सुरू होती. ती खऱ्या अर्थाने काल स्वप्नीलने कांस्यपदक मिळवल्यानंतर फळाला आली. ‘माझ्या पोरानं आमचं नाव केलं’ असं त्यांचं कौतुकाचं तोंडभरून शब्द होतं. आता ऑिलंपिकमध्ये यश मिळवून देशाचं नाव करावं हे त्यांचं स्वप्न आहे.

टॅग्स