बेडेने, चुंग पात्रता फेरीत खेळणार 

पीटीआय
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

चेन्नई - ब्रिटनचा अल्जाझ बेडेने आणि दक्षिण कोरियाचा चुंग हीऑन चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत सहभागी होतील. बेडेने 27 वर्षांचा आहे. तो स्लोव्हेनियात जन्मला. 2015 पर्यंत तो स्लोव्हेनियाकडून खेळला. त्यानंतर तो ब्रिटनचा नागरिक बनला. गेल्या वर्षी तो या स्पर्धेत सहभागी झाला होता. अंतिम सामन्यात स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींका याच्याकडून तो हरला. 45 हा त्याचा कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमांक आहे. चुंग 20 वर्षांचा आहे.

गेल्या वर्षी त्याने "सर्वाधिक प्रगती केलेला खेळाडू' हा पुरस्कार मिळविला. 51 हा त्याचा सर्वोत्तम क्रमांक आहे. तो दक्षिण कोरियाच्या डेव्हिस करंडक संघातील नियमित खेळाडू आहे. पात्रता फेरीत अर्जेंटिनाचा निकोलस किकर (110), जोझेफ कोवॅल्क (117), जुर्गन मेल्झर (136), मार्को ट्रुंगेल्लीटी (146), स्टीव्हन डीएझ (166) व फेडेरिको गायओ (175) यांचाही सहभाग असेल. पात्रता फेरीचे सामने 31 डिसेंबर व एक जानेवारी रोजी होतील. 

क्रीडा

लंडन - इंग्लंडमधील ट्‌वेंटी ट्‌वेंटी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील...

12.51 PM

मुंबई - पी. व्ही. सिंधू तसेच बी. साईप्रणीत आणि अजय जयराम यांनी भारतीय बॅडमिंटनची ताकद दाखवत जागतिक स्पर्धेतील आपली मोहीम सुरू...

08.51 AM

नवी दिल्ली - निवड समितीने सादर केलेल्या शिफारसीनुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी पॅरालिंपियन देवेंद्र झाझरिया आणि माजी...

08.51 AM