जोकोविचला पाब्लो बुस्टाने झुंजवले

पीटीआय
शनिवार, 22 एप्रिल 2017

माँटो कार्लो - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच अजूनही पूर्ण लय मिळविण्यात अपयशी ठरत आहे. माँटो कार्लो टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने प्रवेश केला असला, तरी त्याला स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाविरुद्ध विजयासाठी झुंजावे लागले. जोकोविचने ही लढत ६-२, ४-६, ६-४ अशी जिंकली. 

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या जोकोविचची गाठ आता बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनशी पडणार आहे. माजी फ्रेंच ओपन विजेता स्टॅन वाव्रींका, रॅफेल नदाल यांनीदेखील आपली आगेकूच कायम राखली. 

वाव्रींकाने उरुग्वेच्या पाब्लो क्‍युएवासचे आव्हान ६-४, ६-४ असे मोडून काढले. नदालने ॲलेक्‍झांडर झ्वेरेवचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला. 

दहाव्या विजेतेपदासाठी उत्सुक असणाऱ्या नदालची गाठ आता अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्टझमानशी पडणार आहे. त्याने जर्मनीच्या यान लेनार्ड स्टर्फ याचा ६-३, ६-० असा पराभव केला. नदाल म्हणाला, ‘‘माझा खेळ आता अधिक चांगला होत आहे. पूर्वीसारखी आक्रमकता दिसून येत आहे. आजच्या लढतीत मी अगदी सुरवातीपासून पूर्ण क्षमतेने खेळलो. विशेष म्हणजे फोरहॅंडची ताकद अधिक वाढत आहे. प्रत्येक सामन्यात असाच खेळ करण्याचा माझा प्रयत्न असेल.’’

जोकोविचला मात्र सलग दुसऱ्या लढतीत तीन सेटचा सामना करावा लागला. तो म्हणाला, ‘‘खरंच, मला क्‍ले कोर्टवर यंदा अजून लय गवसलेली नाही; पण विजय मिळतो, हे महत्त्वाचे आहे. मला प्रेरित होण्यासाठी विजय पुरेसा असतो.’’

मरेचे आव्हान संपुष्टात आणणाऱ्या रामोसची गाठ आता पाचव्या मानांकित मरिन चिलीचशी पढणार आहे. त्याने नवव्या मानांकित टोमास बर्डीच याचे आव्हान ६-२, ७-६(७-०) असे मोडून काढले.