सोमदेव देववर्मनची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

सोमदेव 2012 पासून खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळेच त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सोमदेव प्रशिक्षक म्हणून पुढील कारकिर्द पूर्ण करण्याच्या विचारात आहे.

नवी दिल्ली - दुखापतीने त्रस्त असलेला भारताचा आघाडीचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने आज (रविवार) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

सोमदेवने आपल्या ट्विटर पेजवरून निवृत्तीबाबत घोषणा करताना सांगितले, की यावर्षाच्या सुरवातीलाच मी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेत टेनिससाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार. नवे वर्ष नवी सुरवात.

सोमदेव 2012 पासून खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळेच त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सोमदेव प्रशिक्षक म्हणून पुढील कारकिर्द पूर्ण करण्याच्या विचारात आहे. पुरुष एकेरीत सोमदेवने 2008 मध्ये टेनिस क्षेत्रात पदार्पण केले होते. डेव्हिस करंडकासाठी तो भारतीय संघाचा सदस्य होता. 

Web Title: Somdev Devvarman announces retirement from professional tennis