अव्वल स्थानाला फेडरर मुकणार

अव्वल स्थानाला फेडरर मुकणार

मायामी - प्रदीर्घ कालावधीनंतर मिळविलेले जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान रॉजर फेडररला तितक्‍याच झटपट गमवावे लागणार आहे. मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत त्याला पात्रता फेरीतून आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या थानासी कोक्किनाकिसकडून ३-६, ६-३, ७-६ (७-४) असा पराभव पत्करावा लागला. कोक्किनाकिस क्रमवारीत १७५व्या स्थानावर आहे. 

फेडररला अव्वल स्थान टिकविण्यासाठी या स्पर्धेत किमान उपांत्यपूर्व फेरी गाठणे आवश्‍यक होते. स्पेनचा रॅफेल नदाल पुन्हा अव्वल स्थानावर येईल. जागतिक क्रमवारीत खालचे मानांकन असताना अव्वल स्थानावरील खेळाडूवर विजय मिळविणारा कोक्किनाकिस दुसरा टेनिसपटू ठरला. यापूर्वी स्पेनच्या फ्रान्सिस्को क्‍लाव्हेट याने १७८व्या स्थानावर असताना ऑस्ट्रेलियाच्या लेटॉन ह्युईटवर २००३ मध्ये मायामी स्पर्धेत विजय मिळविला होता. फेडररने आज पहिला सेट सहज जिंकला. त्याच्या सर्व्हिसवर त्याने केवळ सहा गुण गमावले. दुसऱ्या सेटमध्ये फेडररला एकदा सर्व्हिस गमवावी लागली आणि याचा फायदा घेत कोक्किनाकिसने लढत निर्णायक सेटमध्ये नेली. निर्णायक सेटमध्ये फेडररला प्रदीर्घ झालेल्या सहाव्या गेममध्ये दोन ब्रेक पॉइंट साधण्यात अपयश आले, त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. यात कोक्किनाकिसने आघाडी ६-४ अशी घेतली होती. फेडररचा बॅकहॅंड नेटमध्ये अडकल्याने कोक्किानाकिसच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

युकीचा पराभव
भारताच्या युकी भांब्रीची आगेकूच दुसऱ्या फेरीत संपुष्टात आली. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असणाऱ्या जॅक सॉकने त्याला ६-३, ७-६(७-३) असे सहज पराभूत केले. ही लढत १ तास ३६ मिनिटे चालली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com