युकी, साकेत करणार पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

डेव्हिस करंडकासाठी पेसला वगळण्याचे संकेत

नवी दिल्ली - कॅनडाविरुद्धच्या जागतिक गटातील प्ले-ऑफ डेव्हिस करंडक लढतीसाठी युकी भांब्री आणि साकेत मैनेनी यांचे पुनरागमन निश्‍चित धरले जात असून, अनुभवी लिएँडर पेसला पुन्हा एकदा वगळलेच जाणार, असेच चित्र सध्या दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या लढतीसाठी उद्या (ता. १४) भारतीय टेनिस संघटनेच्या निवड समितीची बैठक होणार आहे. 

डेव्हिस करंडकासाठी पेसला वगळण्याचे संकेत

नवी दिल्ली - कॅनडाविरुद्धच्या जागतिक गटातील प्ले-ऑफ डेव्हिस करंडक लढतीसाठी युकी भांब्री आणि साकेत मैनेनी यांचे पुनरागमन निश्‍चित धरले जात असून, अनुभवी लिएँडर पेसला पुन्हा एकदा वगळलेच जाणार, असेच चित्र सध्या दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या लढतीसाठी उद्या (ता. १४) भारतीय टेनिस संघटनेच्या निवड समितीची बैठक होणार आहे. 

यापूर्वी बंगळूर येथे झालेल्या उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी पेसचा सहा खेळाडूंमध्ये समावेश होता; मात्र अंतिम संघ निवडताना कर्णधार महेश भूपतीने त्याला वगळले होते. त्या वेळी पेस आणि भूपती यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते.

या वेळी मात्र निवड समिती या सगळ्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पेसला संभाव्य संघातूनच वगळण्याची शक्‍यता दिसून येत आहे. तसाही पेस रोहन बोपण्णा (२१), दिवीज शरण (५३) आणि पूरव राजा (५४) या दुहेरीतील तीन खेळाडूंपेक्षा क्रमवारीत खूप मागे आहे. हा निकष त्याला वगळताना लावला जाऊ शकतो. 

एकेरीत भांब्री चांगलाच फार्ममध्ये आहे. त्याने जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर असणाऱ्या गेल मोंफिसला हरवण्याची कामगिरी करून दाखवली आहे. साकेत दुखापतीमुळे उझबेकिस्तानविरुद्ध खेळू शकला नव्हता. त्यामुळे आता १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या लढतीत एकेरीसाठी या दोघांच्या नावाचा विचार होऊ शकतो. दुहेरीसाठी बोपण्णाच्या जोडीला कोण या प्रश्‍नाचे उत्तर निवड समिती शोधेल. उझबेकिस्तानविरुद्ध खेळलेले प्रज्ञेश गुणेश्‍वरन आणि एन. श्रीराम बालाजी यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश होईल. भारतीय संघाचे सराव शिबिर कोलंबिया विद्यापीठाच्या कोर्टवर होणार आहे. 

पेससाठी दरवाजे बंद झालेले नाहीत. त्याने भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी जागतिक क्रमवारीत घसरलेले स्थान पुन्हा उंचवावे. आम्ही संघ निवडताना मानांकनाचाच विचार करतो.
- हिरोन्मय चॅटर्जी, भारतीय टेनिस संघटनेचे सचिव

क्रीडा

लंडन : इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव झाल्यामुळे आता श्रीलंकेचा संघ 2019 मध्ये होणाऱ्या विश्‍...

02.09 PM

सुवर्ण लक्ष्य साधण्यासाठी आहारासह प्रशिक्षणाचा सर्व खर्च उचलणार पुणे - प्रतिकूल परिस्थितीला ‘पंच’ देऊन बॉक्‍सिंगमध्ये कारकीर्द...

09.15 AM

यंदाच्या मोसमात वयाच्या ३६व्या वर्षीदेखील सहजतेने खेळणाऱ्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...

09.12 AM