लंडन जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत आज मोनिकाची कसोटी 

लंडन जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत आज मोनिकाची कसोटी 

नाशिक - लंडन येथे होत असलेल्या जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे सहभागी झाली आहे. या स्पर्धेत आज (ता. 6) तिची मॅरेथॉन असून, लंडन येथील वेळेनुसार दुपारी दोनला (भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहाला) ही स्पर्धा होईल. दिल्ली मॅरेथॉनमध्ये पात्रता मिळविल्याने ती या जागतिक मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र ठरली. तिच्या कामगिरीकडे देशभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. 

या जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत पात्रतेसाठी 2 तास 42 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ नोंदवणे आवश्‍यक होते. मोनिकाने दिल्ली मॅरेथॉनमध्ये ही स्पर्धा 2 तास 39.8 मिनिटांत पूर्ण करत लंडनला होणाऱ्या जागतिक मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्रता पूर्ण केली होती. डिसेंबर 2016 व जानेवारी 2017 दरम्यान मोनिकाने पाच स्पर्धा जिंकल्या. 20 नोव्हेंबर 2016 ला झालेल्या दिल्ली मॅरेथॉनपासून मोनिका धावत होती. दिल्ली, कोलकता, भोपाळ, वसई-विरार, हैदराबाद या पाच स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. मॅरेथॉन स्पर्धेचा अनुभव असलेल्या खेळाडूंच्या अनुभवानुसार दोन अर्धमॅरेथॉनमध्ये किमान पंधरा दिवसांचे अंतर असावे, असा संकेत असतानाही ती मॅरेथॉनचा सराव करत होती. डॉक्‍टरांबरोबर याबाबत चर्चा करत तिने हा निर्णय घेतला. दिल्लीतील फेब्रुवारीच्या स्पर्धेद्वारे जागतिक पात्रता तिने साध्य केली. 

कामगिरी उंचावणारीच 
ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत 2009 मध्ये तिने सहभाग घेतला होता. पण पुढे असलेला पायलट मार्ग चुकल्याने ती जवळपास एक किलोमीटर अंतर पुढे गेल्यावर त्या पायलटला त्याची जाणीव झाल्याने पुन्हा मागे येऊन मुख्य मार्गाला लागले. या स्पर्धेत महिलांच्या गटात ती दुसरी आली. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत 15 किलोमीटरचे अंतर 1 तास 2 मिनिटे 8 सेकंद ही वेळ देऊन हुकलेले विजेतेपद खेचून आणले. संस्थेचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, नाशिक विभागाचे कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, भोसला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचेता कोचरगावकर, प्रशिक्षक विजयेंद्रसिंग यांनी मोनिकाला शुभेच्छा दिल्या. 

सरावाचा फायदा होणारच 
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर सराव करणारी मोनिका मूळची दिंडोरी तालुक्‍यातील पिंपळगाव केतकी येथील. तिच्या वडिलांनी खेळासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या भोसला सैनिकी महाविद्यालयात तिला संधी मिळाली. भोसला महाविद्यालयाच्या मैदानावर मोनिका पहाटे पाच ते सहापर्यंत, सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत सराव करते. पूर्ण मॅरेथॉनला अनेकदा तिने पहाटे साडेतीनपासून सराव करत विशेष परिश्रम घेतले आहेत. "साई'चे प्रशिक्षक विजयेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com