यशस्वी सुपर टॅकलनंतर अभिलाषाची प्रभावी चढाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई/पुणे - मोक्‍याच्या वेळी सुवर्णा बारटक्केने केलेल्या सुपर टॅकलनंतर अभिलाषा म्हात्रेने केलेल्या प्रभावी चढायांच्या जोरावर महाराष्ट्राने राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत बिहारला उत्तरार्धात प्रतिकाराचीही संधी दिली नाही. त्यानंतर झारखंडचा ६५-१५ असा धुव्वा उडवून सलग चौथ्या विजयासह गटविजेतेपदासह बाद फेरी गाठली. 

पाटणा येथील पाटलीपुत्र स्टेडियमवरील बंदिस्त हॉलमध्ये ही स्पर्धा होत आहे. त्यात राज्याच्या महिलांनी हुकूमत कायम ठेवली आहे. पंजाबला सकाळच्या सत्रात २७-१७ असे हरवून आत्मविश्‍वास उंचावलेल्या महाराष्ट्रास दुपारी बिहारच्या कडव्या लढतीस सुरवातीस सामोरे जावे लागले. महाराष्ट्र उत्तरार्धात १४-१२ आघाडीवर होता. त्याचवेळी सुवर्णाने सुपर टॅकल केली. त्यानंतरही महाराष्ट्राची आघाडी २०-१५ अशी काहीशी मर्यादितच होती. त्याचवेळी अभिलाषाने एकाच चढाईत तिघींना बाद करीत महाराष्ट्राची आघाडी १० गुणांपर्यंत नेली आणि अखेर ३०-१९ असा विजय मिळविला. त्यापूर्वी पंजाबविरुद्ध अभिलाषा, सायली जाधव, दीपिका, सुवर्णा बारटक्के, सायली केरीपाळे यांचा खेळ निर्णायक ठरला.