इंग्लंडच्या सुंदर क्रिकेटपटू सोबत अर्जुन तेंडुलकरचे लंडन 'पर्यटन'

इंग्लंड महिला संघाची क्रिकेटपटू डेनियल व्याटने तिच्या इंस्टाग्रामवर अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो शेअर केला.
arjun tendulkar england danni wyatt
arjun tendulkar england danni wyatt

टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये एकमेव टेस्ट सामाना खेळण्याची तयारी करत आहे. खेळाडूंव्यतिरिक्त, इतर अनेक स्टार्स देखील या दिवसात इंग्लंडला आले आहेत, त्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन सध्या आहे. अर्जुन तेंडुलकर काही दिवसांपूर्वीच इंग्लंडला आला आहे. त्याच दरम्यान त्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

arjun tendulkar england danni wyatt
सामायरा शर्माचा क्युट व्हिडीओ, रोहितच्या तब्येतीबद्दल म्हणतेय...

इंग्लंड महिला संघाची क्रिकेटपटू डेनियल व्याटने तिच्या इंस्टाग्रामवर अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो शेअर केला आहे. अर्जुन तेंडुलकर येथे डेनियल व्याटसोबत लंचचा आनंद घेत आहे. डेनियल वेट आणि अर्जुन तेंडुलकर यांनी लंडनमधील सोहो रेस्टॉरंटमध्ये जेवण केले, डॅनियल वेटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या लंचचा फोटो शेअर केला आहे.

अर्जुन तेंडुलकर नुकताच इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससोबत होता. अर्जुन तेंडुलकरला या हंगामामध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला ३० लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. त्याचे पदार्पण होईल असे अनेकवेळा वाटत होते, पण अर्जुनची प्रतीक्षा वाढले आहे. 2021 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने मुंबईसाठी दोन सामने खेळले आहे.

डेनियल वेटच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ही 31 वर्षीय महिला क्रिकेटर इंग्लंडची एक मोठी स्टार आहे. डेनियल वेटने इंग्लंडसाठी 93 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने जवळपास 1500 धावा आणि 27 विकेट्स घेतल्या आहे. तर 124 टी-20 सामन्यांमध्ये डेनियलच्या जवळपास 2 हजार धावा आणि 46 विकेट आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात डेनियल वेटही इंग्लंड-अ संघाचा भाग होता, त्याने येथे केवळ 8 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com