ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 243 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

स्मिथसह वॉर्नर व पीटर हॅंड्‌सकोम्ब (13 धावा - 17 चेंडू) हे फलंदाजही परतल्याने अडचणीत सापडलेल्या ऑस्ट्रेलियास ट्रॅव्हिस हेड (42 धावा - 59 चेंडू) व मार्कस स्टॉईनीस (46 धावा - 63 चेंडू) यांनी सावरले. हेड व स्टॉईनीस यांच्यात झालेली 87 धावांची भागीदारी ऑस्ट्रेलियाच्या आव्हानामधील मुख्य भागीदारी ठरली

नागपूर - भारताविरुद्धच्या पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात आज (रविवार) प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (53 धावा - 62 चेंडू) याच्या अर्धशतकाचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही फलंदाजास मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव तुलनात्मकदृष्टया कमी धावांत आटपला.

तत्त्पूर्वी, वॉर्नर व ऍरॉन फिंच (32 धावा - 36 चेंडू) यांनी आज पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतकी सलामी दिली. भारतीय गोलंदाजांवर पहिल्या टप्प्यात पूर्ण प्रभुत्व गाजविलेली ही जोडी हार्दिक पांड्या (14 धावा - 1 बळी) याने फिंच याला बाद करत फोडली. यानंतर आलेला कर्णधार स्टीव्हन स्मिथ (16 धावा - 25 चेंडू) हा फारशी चमक दाखवू शकला नाही. केदार जाधव (48 धावा - 1 बळी) याने त्याला पायचीत करत भारतासमोरील मोठा अडसर दूर केला.

स्मिथसह वॉर्नर व पीटर हॅंड्‌सकोम्ब (13 धावा - 17 चेंडू) हे फलंदाजही परतल्याने अडचणीत सापडलेल्या ऑस्ट्रेलियास ट्रॅव्हिस हेड (42 धावा - 59 चेंडू) व मार्कस स्टॉईनीस (46 धावा - 63 चेंडू) यांनी सावरले. हेड व स्टॉईनीस यांच्यात झालेली 87 धावांची भागीदारी ऑस्ट्रेलियाच्या आव्हानामधील मुख्य भागीदारी ठरली.

भारताकडून अक्‍सर पटेल (38 धावा - 3 बळी) याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय भुवनेश्‍वर कुमार (40 धावा - 1 बळी), पांड्या आणि जाधव यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला; तर जसप्रित बुमराह (51 धावा - 2 बळी) याने दोन बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली.

Web Title: australia cricket india