बॅडमिंटनपटू सिंधूची पद्मभूषणसाठी शिफारस

वृत्तसंस्था
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

सिंधूने 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती. सिंधूला यापूर्वी भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे.

नवी दिल्ली - भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

क्रीडा मंत्रालयाने केंद्र सरकारकडे पद्मभूषण पुरस्कारासाठी सिंधूची शिफार केली आहे. याबाबत क्रीडा मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे. सिंधूने नुकतेच कोरिया ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद मिळविले होते. गेल्या काही स्पर्धांमध्ये सिंधूची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे.

सिंधूने 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती. सिंधूला यापूर्वी भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. आता तिची पद्मभूषणसाठी शिफारस करण्यात आली आहे. 

Web Title: Badminton superstar PV Sindhu recommended for Padma Bhushan