बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुली?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नव्या अध्यक्षपदाचा शोध सुरू झाला आहे. लोढा समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांत सध्या तरी आजीव अनुभवी सदस्यांपैकी कुणीच बसत नसल्यामुळे भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचे नाव चर्चेत आले आहे. अर्थात, त्याच्या भोवतीदेखील लोढा समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा वेढा असल्यामुळे सध्या तरी बीसीसीआय अध्यक्षपदासाठी प्रश्‍नचिन्ह उभे आहे.

नियमानुसार बीसीसीआयच्या पाच उपाध्यक्षांपैकी एकच अध्यक्षपदावर बसू शकतो; पण यापैकी एकही व्यक्ती लोढा समितीची मार्गदर्शक तत्त्वे पुरी करू शकत नाही. त्यामुळे प्रथमच बीसीसीआयमध्ये शिरकाव करणाऱ्या सौरभ गांगुलीचे पारडे जड मानले जात आहे.

भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीदेखील गांगुलीच्या नावाला पुष्टी दिली आहे. गावसकर म्हणाले, 'बीसीसीआयकडे दुसरी फळीदेखील मजबूत आहे. ही फळीदेखील मोठी जबाबदारी पार पाडू शकते. यात माझ्यासमोर पहिले नाव सौरभ गांगुलीचे येते.''

बीसीसीआयमधील सध्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष सी. के. खन्ना यांच्यावर मुदगल समितीने परस्पर हितसंबंधाचा ठपका ठेवला आहे. त्याचबरोबर ते दिल्ली संघटनेचे पदाधिकारी आहेत. आसामच्या गौतम रॉय यांचीही स्थिती अशीच आहे. गंगा राजू हे आंध्रचे उपाध्यक्षदेखील याच रांगेत मोडतात. या सर्वांना लोढा समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांना आता विश्रांतीच घ्यावी लागेल.

अशा सगळ्या चर्चेत सौरभ गांगुलीचे नाव येत असले, तरी त्याच्याबाबतही संदिग्धता राहतेच. गांगुलीनेदेखील बंगाल क्रिकेट संघटनेत तीन वर्षे काम पाहिले आहे. त्यामुळे नियमानुसार तोदेखील अध्यक्षपदासाठी अपात्र ठरू शकतो. पण, या सर्व नुसत्या चर्चा असल्या तरी गांगुलीला मिळत असलेली पहिली पसंती नाकारता येणार नाही.

Web Title: BCCI president's race Ganguly?