जागतिक क्रमवारीतही सिंधू मरिनपेक्षा सरस?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मुंबई - इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळी जागतिक क्रमवारीत पाचवी असलेली पी. व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत दुसरी असेल, तसेच या क्रमवारीत ती ऑलिंपिकविजेत्या कॅरोलीन मरिन हिलाही मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

सुपर सीरिज विजेतेपदासाठी 9 हजार 200 गुण देण्यात येतात, तर उपविजेत्यास 7 हजार 800 गुण मिळतात. अर्थात त्याचबरोबर गेल्या 52 आठवड्यांतील कामगिरीही लक्षात घेतली जाते. सिंधूचे 71 हजार 599 गुण आहेत. इंडिया ओपन विजेतेपदामुळे ती 75 हजार 759 गुणांपर्यंत जाईल, असा कयास आहे. त्यामुळे ती तिसऱ्या स्थानावरील मरिनसह सध्या दुसरी असलेली अकेन यामागुची (जपान) आणि चौथी असलेल्या सुंग जी ह्यून (कोरिया) यांना मागे टाकेल.

सिंधू तसेच साईना आता मलेशिया ओपन सुपर सीरिज प्रीमियर स्पर्धेत सहभागी होतील. ही स्पर्धा कुचिंग येथे 4 एप्रिलपासून होईल. साईना यापूर्वीच मलेशियात दाखल झाली आहे, तर सिंधू आज सकाळी मलेशियास रवाना झाली. या स्पर्धेत सिंधूला सहावे मानांकन आहे, तर साईनाला मानांकन क्रमवारीत स्थान नाही; पण दोघींच्यात अंतिम फेरीपूर्वी लढत अपेक्षित नाही. पहिल्या दिवशी पात्रता फेरीच्या लढती होतील.