दुबईतील बुद्धिबळ स्पर्धेत भक्तीची अव्वल कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पणजी - दुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याची वूमन ग्रॅंडमास्टर भक्ती कुलकर्णी हिने महिलांत सर्वोत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस जिंकले. तिने नऊपैकी साडेपाच गुणांची कमाई केली. 

पणजी - दुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याची वूमन ग्रॅंडमास्टर भक्ती कुलकर्णी हिने महिलांत सर्वोत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस जिंकले. तिने नऊपैकी साडेपाच गुणांची कमाई केली. 

महिलांत अव्वल क्रमांक पटकाविताना भक्तीने शेवटच्या फेरीत चीनच्या डेंग तियान्ले हिला नमविले. स्पर्धेत एकूण 42 देशांतील बुद्धिबळपटूंना भाग घेतला होता. वूमन इंटरनॅशनल मास्टर मिला झार्कोविच हिला दुसरा क्रमांक मिळाला. भारताची अनुभवी इंटरनॅशनल मास्टर तानिया सचदेव, राष्ट्रीय विजेती पद्मिनी रौत, तीन वेळची माजी राष्ट्रीय विजेती मेरी ऍन गोम्स, इजिप्तची वूमन ग्रॅंडमास्टर मोना खालिद, फ्रेंच वूमन ग्रॅंडमास्टर नायनो मैसुराझे, जॉर्जिया वूमन ग्रॅंडमास्टर इग्ना चार्खालाश्‍विली यांनीही बक्षीसविजेत्या खेळाडूंत स्थान मिळविले. 

भक्ती सध्याची आशियाई महिला विजेती असून "गोवा कार्बन लिमिटेड'ची सदिच्छा दूत आहे. गेल्या फेब्रुवारीत भक्तीने भोपाळ येथे एअर इंडियाचे प्रतिनिधित्व करताना भोपाळ येथे राष्ट्रीय सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. गोवा बुद्धिबळ संघटनेने भक्तीचे अभिनंदन केले आहे.