चैत्राली गुजरला ‘वेगवान धावपटू’ किताब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

नागपूर - कोईम्बतूर येथील ज्युनिअर फेडरेशन करंडक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत मुलींची शंभर मीटर शर्यत जिंकून महाराष्ट्राच्या चैत्राली गुजरने वेगवान धावपटूचा मान मिळविला. मुलांच्या शर्यतीत पंजाबच्या गुरविंदर सिंगने नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलींनी तीन सुवर्णपदके जिंकली. 

नागपूर - कोईम्बतूर येथील ज्युनिअर फेडरेशन करंडक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत मुलींची शंभर मीटर शर्यत जिंकून महाराष्ट्राच्या चैत्राली गुजरने वेगवान धावपटूचा मान मिळविला. मुलांच्या शर्यतीत पंजाबच्या गुरविंदर सिंगने नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलींनी तीन सुवर्णपदके जिंकली. 

वडील कालिदास आणि भाऊ अनिरुद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली साताराच्या मातीत सराव करणाऱ्या चैत्रालीचे हे गेल्या सहा महिन्यांतील राष्ट्रीय पातळीवरील तिसरे सुवर्णपदक होय. नोव्हेंबर महिन्यात गुंटूर येथे प्रथम ज्युनिअर राष्ट्रीय आणि त्यानंतर गुंटूर येथेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत चैत्रालीने सुवर्णपदक जिंकले. निर्धारीत कार्यक्रमानुसार शभंर मीटरची शर्यत शुक्रवारी होणार होती. मात्र, पाऊस आणि अंधूक प्रकाश यामुळे शर्यत शनिवारी सकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्याचा परिणाम चैत्रालीच्या कामगिरीवर झाला. तिने शर्यत जिंकली मात्र, १२.०५ सेकंद अशी संथ वेळ दिली. या कामगिरीमुळे तिची पुढील महिन्यात कोलंबोत होणाऱ्या दक्षिण आशियाई आणि जून महिन्यात जपानमधील गिफू येथे होणाऱ्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड निश्‍चित मानली जात आहे. यापूर्वी आंतर विद्यापीठ स्पर्धेत नोंदविलेली १२.०८ सेकंद ही तिची सर्वोत्तम वेळ होती. यात महाराष्ट्राची दुसरी धावपटू सिद्धी हिरेची पाचव्या स्थानावर घसरण झाली. तिने १२.३७ सेकंद अशी वेळ दिली. 

मुलींच्या पंधराशे मीटर शर्यतीत नाशिकच्या धावपटूंचे वर्चस्व राहिले. अनुभवी दुर्गा देवरेने सुवर्णपदकाला गवसणी घालताना ४ मिनिटे ३०.४३ सेकंद अशी वेळ नोंदवली. तिची सरावातील सहकारी आणि गेल्याच महिन्यात जमैका येथून प्रशिक्षण घेऊन परतलेल्या ताई बाम्हनेने रौप्यपदक जिंकले. तिने ४ मिनिटे ३६.६१ सेकंद अशी वेळ दिली. ज्युनिअर आशियाई स्पर्धेच्या निवडीच्या दृष्टीने गेल्या स्पर्धेतील तिसऱ्या कामगिरी विचारात घेण्यात येणार आहे. त्यानुसार दुर्गाने ही पात्रता गाठली असली तरी ताईची पात्रता थोडक्‍यात हुकली. 

‘कडक उन्ह आणि त्यात पाऊस पडल्याने बदललेल्या वातावरणाचा कामगिरीवर परिणाम झाला. अन्यथा आणखी वेगवान वेळ देऊ शकली असती. दक्षिण आशियाई व ज्युनिअर आशियाई स्पर्धेसाठी निवड होईल, अशी आशा आहे. मात्र, विश्‍व ज्युनिअरची पात्रता गाठण्यासाठी आणखी मेहनत करावी लागेल. 
- चैत्राली गुजर

Web Title: Chaitrali gujar fast runners