‘आयपीएल’साठी वेळापत्रकात बदल

वृत्तसंस्था
बुधवार, 25 एप्रिल 2018

नवी दिल्ली - लोढा समितीने केलेल्या शिफारशी आणि बीसीआयच्या आयपीएलसाठी ‘आयसीसी’लादेखील पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या कार्यक्रमात बदल करावा लागला. बदललेल्या कार्यक्रमानुसार भारत आपला पहिला सामना २ जून ऐवजी ५ जून २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.

नवी दिल्ली - लोढा समितीने केलेल्या शिफारशी आणि बीसीआयच्या आयपीएलसाठी ‘आयसीसी’लादेखील पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या कार्यक्रमात बदल करावा लागला. बदललेल्या कार्यक्रमानुसार भारत आपला पहिला सामना २ जून ऐवजी ५ जून २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.

लोढा समितीच्या शिफारशीनुसार आयपीएलनंतर भारतीय खेळाडू १५ दिवस कुठलाही सामना खेळू शकत नाहीत. याच कारणामुळे आयसीसीला भारताचा पहिला सामना पुढे ढकलणे भाग पडले. कोलकता येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय संघाला पुन्हा एकदा या स्पर्धेतील संभाव्य विजेता म्हणून पहिली पसंती मिळत आहे. इंग्लंडमध्ये होणारी ही पाचवी विश्‍वकरंडक स्पर्धा असेल.

या संदर्भात अधिक माहिती देताना ‘बीसीसीआय’चा एक पदाधिकारी म्हणाला,‘‘पुढील वर्षी २९ मार्च ते १९ मे या कालावधीत आयपीएल होणार आहे. विश्‍वकरंडक स्पर्धा ३० मे रोजी सुरू होईल. त्यामुळे लोढा समितीच्या शिफारशीनुसार आपण केवळ ५ जून रोजी खेळण्यास सुरवात करू शकतो. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आपला पहिला सामना २ जून रोजी होती. त्या दिवशी खेळणे आपल्याला शक्‍य नव्हते.’’ बैठकीस उपस्थित असणाऱ्या भारतीय पदाधिकाऱ्यांनी ही अडचण सांगितल्यावर आयसीसीने ती समजून घेऊन बदल करण्याचा निर्णय घेतला. आता हा बदल मान्यतेसाठी आयसीसी कार्यकारी मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. 

वेगळी सुरवात
आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेची सुरवात गेल्या काही स्पर्धेतून भारत-पाक सामन्याने होते. हा सामना प्रत्येकवेळेस हाऊस फुल्ल होतो, असा अनुभव आहे. मात्र, या वेळी प्रथमच भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी खेळविण्यात आला आहे. पुढील स्पर्धा ही १९९२ प्रमाणे राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येणार असल्यामुळे हा बदल करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.

आयसीसीने या बैठकीत २०१९ ते २०२३ या कालावधीसाठी कार्यक्रम निश्‍चित केला. या ‘एफटीपी’ कार्यक्रमात जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचा समावेश आहे. यातील सर्व सामने हे दिवसाच होणार आहेत. या मान्य करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार भारत ३०९ सामने खेळणार असून, यात १९ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. सर्व कसोटी सामने हे जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील असतील.

Web Title: Change in schedule for IPL