'चॅम्पियन्स करंडकासाठी तत्काळ भारतीय संघ निवडा'

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

प्रशासकीय समितीने सात मुद्द्यांवर भर देत बीसीसीआयला लवकरात लवकर निवड समितीची बैठक बोलावून संघ निवडण्यास सांगितले. संघ निवडीस उशीर करून भारतीय क्रिकेट आणि खेळाडूंची नकारात्मक भूमिका उभारल्याचेही यामध्ये म्हणण्यात आले आहे.

नवी दिल्ली - चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी तत्काळ भारतीय संघ निवडण्याचे आदेश प्रशासकीय समितीने (सीओए) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिले आहेत.

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला 2 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 25 एप्रिलपर्यंत संघ निवडण्याची मुदत बीसीसीआयला दिली होती. मात्र, बीसीसीआयने अद्याप संघाची घोषणा केलेली नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर नेमलेल्या प्रशासकीय समितीने बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांना पत्र लिहून तत्काळ संघ निवडण्याचे आदेश दिले आहेत.