दुहेरीत क्षमता वाढल्याने गोल्डन शटल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट - जागतिक बॅडमिंटनच्या दुहेरीतही भारताची ताकद वाढत असल्याची प्रचिती देत राष्ट्रकुल क्रीडा मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावले. भारताने ही स्पर्धा प्रथमच जिंकली आहे. साईना किंवा सिंधूने दुहेरीत न खेळता भारत जिंकल्याने हे यश महत्त्वाचे ठरले आहे. 
गेली कित्येक वर्षे दुहेरीतील अपयशामुळे भारतास मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत हार पत्करावी लागत होती. मात्र या वेळी मलेशियाविरुद्धच्या अंतिम लढतीत सात्विक साईराज रानकिरेड्डी- अश्‍विनी पोनप्पाने मिश्र दुहेरीच्या लढतीतील निर्णायक गेम चार गुणांच्या पिछाडीनंतर जिंकला. 

वैयक्तिक स्पर्धा नजीक येत असताना बहरलेल्या किदांबी श्रीकांतने एकेरीची लढत सहज जिंकत भारताची आघाडी वाढवली. त्याने ही स्पर्धा दोनदा जिंकलेल्या ली चाँग वेई याला हरवले. चिराग शेट्टी- सात्विकने पुरुष दुहेरीची लढत गमावली; पण भारतीय बॅडमिंटनच्या प्रगतीची वाटचाल सुरू केलेल्या साईना नेहवालने महिला एकेरीची लढत तीन गेममध्ये जिंकत भारताचे सुवर्णपदक निश्‍चित केले. साईनाने दुसरा चुरशीचा गेम गमावला; पण अन्य दोन गेममध्ये मिळून २० गुणच गमावले होते. 

श्रीकांत आणि साईनाचा विजय अपेक्षितच होता, त्यामुळे विजयाचे खरे श्रेय मिश्र दुहेरीतील यशास द्यायला हवे. या लढतीचे दडपण नवोदित सात्विकवर येत होते. त्यामुळेच अश्‍विनीने सातत्याने सहकाऱ्याशी बोलत त्याला चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित केले. त्याचबरोबर तिच्या फ्लिक सर्व्हिसनी मलेशियाच्या जोडीचा कस पाहिला. तिच्या प्रेरणेमुळे सात्विकनेही काही क्रॉस कोर्टस्‌ ड्राइव्ह करीत भारताची बाजू भक्कम केली.

Web Title: common wealth games saina nehwal badminton