बीएमडब्ल्यू परत करून दीपाने घेतली एलांत्रा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

आगरताळा - ऑलिंपियन जिम्नॅस्ट दीपा कर्माकार हिची बीएमडब्ल्यू परत करण्याची इच्छा पूर्ण झाली. ही कार परत करून तिला २५ लाख रुपये मिळाले. ही रक्कम हैदराबाद बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योगपती व्ही. चामुंडेश्‍वरनाथ यांनी दिली. त्यातून तिने ह्युंदाई एलांत्रा कार खरेदी केली. या कंपनीचे सर्व्हिस सेंटर आगरताळा येथे आहे. उरलेली रक्कम ती प्रशिक्षणासाठी वापरणार आहे. देखभालीचा खर्च, सर्व्हिस सेंटर नसणे आणि रस्त्यांची दुरवस्था अशा कारणांमुळे दीपाने बीएमडब्ल्यू कार परत करायचे ठरविले होते. ‘बक्षीस परत करता येत नाही.

आगरताळा - ऑलिंपियन जिम्नॅस्ट दीपा कर्माकार हिची बीएमडब्ल्यू परत करण्याची इच्छा पूर्ण झाली. ही कार परत करून तिला २५ लाख रुपये मिळाले. ही रक्कम हैदराबाद बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योगपती व्ही. चामुंडेश्‍वरनाथ यांनी दिली. त्यातून तिने ह्युंदाई एलांत्रा कार खरेदी केली. या कंपनीचे सर्व्हिस सेंटर आगरताळा येथे आहे. उरलेली रक्कम ती प्रशिक्षणासाठी वापरणार आहे. देखभालीचा खर्च, सर्व्हिस सेंटर नसणे आणि रस्त्यांची दुरवस्था अशा कारणांमुळे दीपाने बीएमडब्ल्यू कार परत करायचे ठरविले होते. ‘बक्षीस परत करता येत नाही. त्यातही सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजाने कारची चावी प्रदान केली असेल तर, अशी भेट परत करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकणार नाही. यावरून वाद होऊ नये,’ असे ती म्हणाली होती.

Web Title: By Deepa BMW took back elantra