पाच महिला बॉक्‍सर उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

बॅंकॉक - भारताच्या पाच महिला बॉक्‍सिंग खेळाडूंनी आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताची पदके निश्‍चित केली. अनामिका (५१ किलो), आस्था पाहवा (७५ किलो), ललिता (६९ किलो), दिव्या पवार (५४ किलो) , नितू घांगास (४८ किलो) यांनी चमकदार विजयासह उपांत्य फेरी गाठली. या विजयासह त्यांनी युवा ऑलिंपिक पात्रतेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. मात्र, जागतिक विजेत्या साक्षी चौधरी (५७ किलो), जॉनी (६० किलो) या दोघींना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर त्यांच्या युवा ऑलिंपिक पात्रतेच्या आशा संपुष्टात आल्या.

Web Title: Five women's boxers in the semifinals