पुण्यातील खेळपट्टीचा निकृष्ट; आयसीसीचा अहवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय कसोटी सामना पुण्यात खेळविण्याचे स्वप्न भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने पूर्ण झाले असले, तरी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला या सामन्याचे आयोजन चांगले महागात पडले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांच्या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानाला काळ्या यादीत टाकले आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या दानावरील खेळपट्टीचा दर्जा निकृष्ट असल्याचे "आयसीसी'ने मंगळवारी जाहीर केले.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिलाच कसोटी सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळविण्यात आला. हा सामना अडीच दिवसांत संपुष्टात आला. फिरकीसाठी अनुकूल करण्यात आलेल्या खेळपट्टीवर भारतच अडकले आणि ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज स्टिफन ओकीफ याने सामन्यात 12 गडी बाद करत भारताला निष्प्रभ केले होते.

या सामन्यासाठी असलेले निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांनी आपल्या अहवालात या खेळपट्टीच्या दर्जाबाबात आयसीसीच्या खेळपट्टी आणि आउटफिल्ड देखरेख पद्धतीच्या नियम 3ला अनुसरून ताशेरे ओढले आहेत. त्यांनी खेळपट्टीचा दर्जा निकृष्ट असल्याचा उल्लेख केला असून, अहवाल "आयसीसी'ला सादर केला. आयसीसीने हा अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सादर केला असून, त्यांना चौदा दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना होता.

"बीसीसीआय'ने अहवालाच्या निकषांवर चौदा दिवसांत उत्तर दिल्यानंतर ते आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापक जिऑफ ऍर्ल्डाइस आणि आयसीसी निरीक्षक रंजन मदुगले यांच्यासमोर ठेवण्यात येईल. ही समिती नियम 4-अ नुसार पुढील निर्णय घेईल. मालिकेतील दुसरा कसोटी सामना बंगळूर येथे एम. चिन्नास्वामी मैदानावर 4 मार्चपासून खेळविण्यात येईल.

काय घडले होते...
-खेळपट्टीवर आठ दिवस पाणीच मारण्यात आले नाही
-संघ व्यवस्थापनाचा हस्तक्षेप झाल्याचे स्थानिक क्‍युरेटरची माहिती
-पाच दिवसांचा कसोटी सामना अडीच दिवसांत आटोपला
-पहिल्या दिवशी फक्त नऊ फलंदाज बाद
-दुसऱ्या दिवशी 15 फलंदाज बाद
-तिसऱ्या दिवशी दोन सत्रांत 16 फलंदाज बाद

Web Title: ICC Match Referee Chris Broad rates Pune pitch as 'poor'