भारतीय बॉक्‍सिंग महासंघास जागतिक संघटनेची संलग्नता

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई - सप्टेंबरमध्ये कार्यान्वित झालेल्या भारतीय बॉक्‍सिंग महासंघास जागतिक संघटनेने पूर्ण संलग्नत्व देण्यात आले. जागतिक संघटनेच्या ल्युसाने येथील वार्षिक सभेत हा निर्णय झाला; पण भारतीय ऑलिंपिक संघटनेने अजय सिंग अध्यक्ष असलेल्या या महासंघास अद्याप मान्यता दिलेली नाही.

मुंबई - सप्टेंबरमध्ये कार्यान्वित झालेल्या भारतीय बॉक्‍सिंग महासंघास जागतिक संघटनेने पूर्ण संलग्नत्व देण्यात आले. जागतिक संघटनेच्या ल्युसाने येथील वार्षिक सभेत हा निर्णय झाला; पण भारतीय ऑलिंपिक संघटनेने अजय सिंग अध्यक्ष असलेल्या या महासंघास अद्याप मान्यता दिलेली नाही.

सप्टेंबरमध्ये मुंबईत झालेल्या भारतीय बॉक्‍सिंग महासंघ निवडणुकीत अजय सिंग यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली होती, तर जय कवळी हे सचिवपदी निवडून आले होते. तेव्हापासून महासंघ जागतिक संघटनेच्या; तसेच भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या संलग्नतेसाठी प्रयत्न करत आहे. जागतिक संघटनेने संलग्नता दिल्यानंतरही भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या संलग्नतेचा प्रश्‍न कायम आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने हा निर्णय संलग्नता समितीकडे सोपवला आहे.

जागतिक संघटनेने आज दिलेली मान्यता अपेक्षितच होती. गेल्याच महिन्यात जागतिक संघटनेच्या कार्यकारिणीने भारतास फेरसदस्यत्व देण्याचा निर्णय एकमताने घेतला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले.

चार वर्षांची अनिश्‍चितता
चार वर्षांपूर्वी म्हणजे 2012 मध्ये भारतीय हौशी बॉक्‍सिंग महासंघ बरखास्त करण्यात आला होता. संघटनेच्या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचे सांगत हा निर्णय झाला होता. दोन वर्षांतच बॉक्‍सिंग इंडियाची स्थापना झाली; पण दीड वर्षात नव्या कार्यकारिणीविरुद्ध अविश्‍वास ठराव संमत झाला. आता या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय बॉक्‍सिंग महासंघाची निवडणूक झाली. त्यानंतर दोन वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा झाल्या आणि आता जागतिक मान्यतेमुळे भारतीय बॉक्‍सरच्या आंतरराष्ट्रीय सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.

क्रीडा

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून अद्याप पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने आगामी भारत...

01.45 PM

दिल्लीचा विजय, तर गुजरातची बरोबरी अहमदाबाद - घरच्या मैदानावर गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सला आपली विजयी मालिका अखेरच्या दिवशी कायम...

10.51 AM

मुंबई - ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल सतत टीका करत असली, तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य चाहते असल्याचे...

10.51 AM