'फिफा' क्रमवारीत भारत 21 वर्षांनी पहिल्या शंभरात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

आंतरराष्ट्रीय लढतीत भारताची गाठ आता 7 जून रोजी लेबेनानशी, तर 13 जून रोजी किर्गिझस्तानशी पडणार आहे. ही लढत एएफसी आशियाई करंडक स्पर्धेची पात्रता फेरीची असेल.

कोलकता - 'फिफा'च्या जागतिक फुटबॉल क्रमवारीत 21 वर्षांत भारतीय फुटबॉल संघ प्रथमच पहिल्या शंभरात आला आहे. 

"फिफा'ने गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत स्टिफन कॉन्स्टटाईन मार्गदर्शक असलेल्या भारतीय संघाने शंभरावे स्थान पटकावले आहे. निकाराग्वा, लिथुआनिया, इस्टोनिया हे अन्य देशही शंभराव्या स्थानावर आहेत. यापूर्वी भारतीय संघ 1996 मध्ये पहिल्या शंभरात आला होता. तेव्हा फेब्रुवारी 96च्या क्रमवारीत भारताचे स्थान 94वे होते आणि तेच आतापर्यंतचे सर्वोत्तम आहे. 

कंबोडिया आणि म्यानमार येथे झालेल्या दोन्ही मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय लढती जिंकल्याचा फायदा भारताला झाला. 

आंतरराष्ट्रीय लढतीत भारताची गाठ आता 7 जून रोजी लेबेनानशी, तर 13 जून रोजी किर्गिझस्तानशी पडणार आहे. ही लढत एएफसी आशियाई करंडक स्पर्धेची पात्रता फेरीची असेल.