भारतीय स्क्वॉश संघ प्रशिक्षकाच्या प्रतीक्षेत

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाच्या आशा असलेला भारतीय स्क्वॉश संघ मात्र मार्च महिन्यापासून प्रशिक्षकाच्या प्रतीक्षेत आहे. भारतीय संघाचे इजिप्तचे प्रशिक्षक अश्रफ अल कारागुई सोडून गेल्यानंतर नव्या प्रशिक्षकाची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. प्रशिक्षकाच्या अभावी भारतीय स्क्वॉश खेळाडू वैयक्तिक पातळीवर सराव करत आहेत. स्क्वॉश संघटनेकडून प्रशिक्षक म्हणून कुणाच्याही नावाची शिफारस झाली नसल्याचे क्रीडा प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाच्या आशा असलेला भारतीय स्क्वॉश संघ मात्र मार्च महिन्यापासून प्रशिक्षकाच्या प्रतीक्षेत आहे. भारतीय संघाचे इजिप्तचे प्रशिक्षक अश्रफ अल कारागुई सोडून गेल्यानंतर नव्या प्रशिक्षकाची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. प्रशिक्षकाच्या अभावी भारतीय स्क्वॉश खेळाडू वैयक्तिक पातळीवर सराव करत आहेत. स्क्वॉश संघटनेकडून प्रशिक्षक म्हणून कुणाच्याही नावाची शिफारस झाली नसल्याचे क्रीडा प्राधिकरणाचे म्हणणे आहे. 

याचा परिणाम भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर होत आहे. सौरभ घोषाल, ज्योश्‍ना चिनप्पा इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. दीपिका पल्लिकल भारताचे प्रशिक्षकपद सोडणाऱ्या कारागुई यांच्याकडेच इजिप्तमध्ये वैयक्तिक प्रशिक्षण घेत आहे. सौरभ म्हणाला, ""आशियाई क्रीडा स्पर्धेसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने एकत्रित सराव करणे अपेक्षित आहे; पण सध्या तरी हे शक्‍य दिसत नाही. कारागुईंसारख्या ज्येष्ठ प्रशिक्षकाला गमावणे हे धक्कादायक आहे. आता त्यांच्याइतका तुल्यबळ प्रशिक्षकाचा शोध अजून संपत नाही, हे याहून मोठे दुर्दैव आहे.'' 

आशियाई स्पर्धेसाठी राष्ट्रीय प्रशिक्षक सायरस पोंचा आणि माजी राष्ट्रीय विजेती भुवनेश्‍वरी कुमारी संघाबरोबर जाणार आहेत. मात्र, यानंतरही भारतीय खेळाडूंना त्यांची खूप कमी मदत होईल असे वाटते. आम्हाला एकमेकांवरच अधिक अवलंबून राहावे लागेल, असे खेळाडूंचे म्हणणे आहे. 

Web Title: Indian squash team Waiting for coach

टॅग्स