ब्रिटिश ग्रां. प्रि. शर्यतीत लुईस हॅमिल्टनची हॅटट्रिक

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जुलै 2016

सिल्व्हरस्टोन - लुईस हॅमिल्टनने सलग तिसऱ्या वर्षी फॉर्म्युला वन मालिकेतील ब्रिटिश ग्रा. प्रि. शर्यत जिंकण्याचा पराक्रम केला. या शर्यतीत मर्सिडिज संघाचाच निको रॉसबर्ग दुसरा आला; पण शर्यतीच्या वेळी संघव्यवस्थापनाबरोबर चर्चा केल्यामुळे त्याचा दुसरा क्रमांक बाद होऊ शकेल.

तीनदा सर्वांगीण विजेतेपद जिंकलेल्या हॅमिल्टन या शर्यतीच्या पात्रतेत अव्वल होता. त्याने सुरवातीपासून आघाडी राखत बाजी मारली. यामुळे सर्वांगीण विजेतेपदाच्या शर्यतीत रॉसबर्ग आणि हॅमिल्टन यांच्यात आता चारच गुणांचा फरक आहे. ट्रॅक ओलसर असल्यामुळे सेफ्टी कार सुरवातीस होती; पण काही वेळातच ती बाहेर पडली. हॅमिल्टनच्या अव्वल क्रमांकापेक्षा रॉसबर्गकडून झालेल्या नियमभंगाचीच चर्चा जास्त झाली. पाच फेऱ्या असताना रॉसबर्गच्या कारमध्ये प्रॉब्लेम झाला. त्याला कार सहाव्या गिअरमधून थेट आठव्या गिअरमध्येच न्यावी लागत होती. त्यामुळे त्याने आपल्या संघव्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यांनी त्याला याबाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स