महाराष्ट्राचे सूरज, स्वाती भारतीय संघात 

 Maharashtras Swati and Suraj  are in the Indian squad
Maharashtras Swati and Suraj are in the Indian squad

पुणे - नवी दिल्ली येथे होणाऱ्या कुमार गटाच्या आशियाई अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेसाठी मुलांच्या फ्री-स्टाइल प्रकारात महाराष्ट्राच्या सूरज, तर मुलींमध्ये स्वाती शिंदे यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. मुलांची निवड चाचणी सोनीपत, तर मुलींची लखनौ येथे पार पडली. संघात निवड झालेला सूरज इंदापूरचा असून, तो पुण्यात काका पवार यांच्याकडे सराव करतो. स्वाती कोल्हापूरला सदाशिवराव मंडलिक कुस्ती केंद्रात दादा लवटे यांच्याकडे मार्गदर्शन घेते.

संघ ः मुले फ्री-स्टाइल ः नवीन (57 किलो), सूरज (61 किलो), करण (65 किलो), सचिन राठी (70 किलो), सचिन गिरी (79 किलो), दीपक पुनिया (86 किलो), सोमवारी (92 किलो), नासिर हुसेन (97 किलो), मोहित (125 किलो) ग्रिको रोमन ः विजय (55 किलो), सचिन राणा (60 किलो), मनजीत (63 किलो), मलकित हुडा (67 किलो), कुलदीप मलिक (72 किलो), साजन (77 किलो), संजीत (82 किलो), सुनील (87 किलो), विरेश कुंडू (97 किलो), आर्यन पन्वर (130 किलो). 

मुली ः शिवानी पवार (50 किलो), स्वाती शिंदे (53 किलो), रीना (55 किलो), मानसी (57 किलो), संगीता फोगट (59 किलो), अंशू (62 किलो), टीना (65 किलो), दिव्या काकरन (68 किलो), सोनिका हुडा (72 किलो), करुणा (76 किलो). 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com