सुमीत, मनोज ऑलिंपिक प्रवेशापासून एक विजय दूर

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

मुंबई : भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंनी ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतील यशोमालिका मंगळवारी देखील सुरू ठेवली. भारताचे मनोज कुमार तसेच सुमीत सांगवान ऑलिंपिक पात्रतेपासून एक विजय दूर आहे. त्याचबरोबर विकास कृष्णननेही बाकू (अझरबैझान) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत विजय मिळवत पात्रतेच्या आशा कायम ठेवल्या.

मनोज कुमारने लाईट वेल्टर वेट (64 किलो) गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने बल्गेरियाच्या आयरिन स्मेतॉव याचा 3-0 असा पाडाव केला, तर सुमीत सांगवाने लाईटहेवीवेट गटात (81 किलो) मंगोलियाच्या एर्देनेबायर सॅंदासुरेन (मंगोलिया) याला 3-0 असेच हरवले, तर सोमवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत विकास कृष्णनने मिडलवेट (75 किलो) गटात जपानच्या माकातो ताकाहाशी याला 3-0 असे हरवले.

सुमीतने तीनही फेऱ्यात 27-20 अशी हुकूमत राखली. त्याचा या लढतीत क्वचितच कस लागला. सुमीतने हुशारीने आक्रमण करताना प्रतिस्पर्ध्यास आपल्या नजीक येऊ दिले नाही. मनोजला मात्र कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. त्याने चांगला प्रतिहल्ला केला. मनोजने दुसऱ्या फेरीत दिलेल्या ठोशाने त्याच्या प्रतिस्पर्ध्यास दुखापत झाली. त्यामुळे त्याचे मनोधैर्य खच्ची झाले. मनोजने त्याचा फायदा घेत बाजी मारली.

मनोजने चांगला हल्ला परतवला. त्याने बचाव आणि आक्रमणाची चांगली सांगड घातली. संधी मिळताच त्याने केलेले आक्रमण जबरदस्त होते. सुमीतने खूपच सुरेख कामगिरी केली. त्याने पहिल्यापासून लढतीवर हुकूमत राखली, तरीही तो कधीही गाफील नव्हता. त्याने प्रतिस्पर्ध्याच्या सर्व योजना हाणून पाडल्या.
- गुरबक्षसिंग संधू, भारतीय मार्गदर्शक