विंबल्डन वाईल्ड कार्डसाठी विनंती नाही - शारापोवा

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

स्पर्धेतील प्रवेशासाठी असलेल्या अंतिम मुदतीपर्यंत तिचे स्थान पुरेसे वर नव्हते. त्यामुळे वाईल्ड कार्ड किंवा पात्रता स्पर्धेतील सहभाग असे दोनच पर्याय तिच्यासमोर होते. या पार्श्वभूमीवर तिने खुलासा केला आहे

लंडन - आगामी विंबल्डन स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड मिळावे म्हणून विनंती करणार नसल्याचे रशियाची वादग्रस्त टेनिसपटू मारिया शारापोवाने स्पष्ट केले. पात्रता फेरीत खेळू असेही तिने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे. जागतिक क्रमवारीतील स्थानानुसार शारापोवाला या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळू शकणार नाही.

शारापोवा 211व्या स्थानावर आहे. स्पर्धेतील प्रवेशासाठी असलेल्या अंतिम मुदतीपर्यंत तिचे स्थान पुरेसे वर नव्हते. त्यामुळे वाईल्ड कार्ड किंवा पात्रता स्पर्धेतील सहभाग असे दोनच पर्याय तिच्यासमोर होते. या पार्श्वभूमीवर तिने खुलासा केला आहे. विंबल्डनची पात्रता स्पर्धा रोहॅम्पटन येथे होते.