मारिया शारापोवाला विजेतेपद 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

अंतिम फेरीत तिने बेलारूसच्या आर्यना सबालेन्कावर 7-5, 7-6 (10-8) अशी मात केली. शारापोवाला गेल्या वर्षी ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरल्यामुळे बंदीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ती पुनरागमन करीत आहे.

तियानजीन : रशियाच्या मारिया शारापोवाने तियानजीन ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

अंतिम फेरीत तिने बेलारूसच्या आर्यना सबालेन्कावर 7-5, 7-6 (10-8) अशी मात केली. शारापोवाला गेल्या वर्षी ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरल्यामुळे बंदीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ती पुनरागमन करीत आहे. तेव्हापासून हे तिचे पहिलेच विजेतेपद आहे. हे तिचे एकूण 36वे विजेतेपद आहे. यापूर्वी तिने 2015 मध्ये इटालियन स्पर्धा जिंकली होती.