मेरी कोमने पटकाविले सुवर्ण पदक

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मेरीने आतापर्यंत सहा वेळा आशियाई स्पर्धेत भाग घेतलेला आहे. यामध्ये पाच स्पर्धांत तिने सुवर्ण पदक मिळविलेले आहे. मेरी यापूर्वी 51 किलो वजनगटातून खेळत होती. यंदा ती 48 किलो वजनी गटातून स्पर्धेत उतरली होती.

हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम) : पाच वेळच्या जगज्जेत्या भारताच्या मेरी कोमने आशियाई महिला बॉक्‍सिंग स्पर्धेत (48 किलो) वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले. 

मेरीने यापूर्वी आशियाई स्पर्धेत चार सुवर्णपदके मिळविली आहेत. उपांत्य फेरीत तिने जपानच्या त्सुबासा कोमुरा हिचा 5-0 असा पराभव केला होता. सहाव्यांदा आशियाई स्पर्धेत खेळताना मेरीने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत तिची गाठ उत्तर कोरियाच्या किम हयांग मी हिच्याशी पडली. मेरीने किमचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.