नेमारसह ब्राझीलही फॉर्मात 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

गतविजेते जर्मनी, बलाढ्य स्पेन यांना सराव सामन्यात चढ-उतार अनुभवावे लागत असताना ब्राझीलने मात्र धडाकेबाज कामगिरी कायम ठेवली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा स्टार नेमार केवळ तंदुरुस्तीच नव्हे, तर फॉर्मही सिद्ध करत आहे. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता सामन्यात ब्राझीलने ऑस्ट्रियाचा 3-0 असा धुव्वा उडवला. नेमार, गॅब्रियस जिसस आणि कुटिन्हो यांनी गोल केले. 

मॉस्को - गतविजेते जर्मनी, बलाढ्य स्पेन यांना सराव सामन्यात चढ-उतार अनुभवावे लागत असताना ब्राझीलने मात्र धडाकेबाज कामगिरी कायम ठेवली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा स्टार नेमार केवळ तंदुरुस्तीच नव्हे, तर फॉर्मही सिद्ध करत आहे. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता सामन्यात ब्राझीलने ऑस्ट्रियाचा 3-0 असा धुव्वा उडवला. नेमार, गॅब्रियस जिसस आणि कुटिन्हो यांनी गोल केले. 

पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या ब्राझीलने या सामन्यात पूर्वार्धात सावध खेळ केला. प्रतिस्पर्धी ऑस्ट्रियाच्या ताकदीचा अंदाज घेतला आणि उत्तरार्धात आपली ताकद दाखवली. हे सराव सामने नेमारची तंदुरुस्ती पडताळण्यासाठी महत्त्वाचे आहेत. फेब्रुवारीत त्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो स्पर्धात्मक फुटबॉलपासून दूर आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात नेमार उत्तरार्धात मैदानात आला होता आणि गोलही केला होता. 

नेमार, जिसस, कुटिन्हो आणि विलियन ही चौकडी ब्राझीलकडून प्रथमच एकत्रित खेळली. या चौघांवर मुख्य स्पर्धेत ब्राझीलची मदार असेल. ऑस्ट्रियाने गेल्या आठ सामन्यांत अपराजित राहण्याची मालिका गुंफली; त्यातच गेल्या आठवड्यातील सराव सामन्यात त्यांनी गतविजेत्या जर्मनीचा पराभव केला होता; परंतु विश्‍वकरंडक स्पर्धेस पात्र न ठरल्यामुळे त्यांच्यासाठी गमावण्यासारखे काहीच नव्हते.

नेमारला 83 व्या मिनिटाला सबस्टिट्यूट करण्यात आले; परंतु तोपर्यंत त्याला ऑस्ट्रियाकडून टार्गेट करण्यात आले. ऍलेकसॅंडर ड्रागोविकने पाठीमागून त्याला टॅकल केले. त्यामुळे पडलेल्या नेमारला काही काळासाठी मैदानावर उपचार करण्यात आले. नेमारने 63 व्या मिनिटाला गोल केला. सहा मिनिटांनंतर कुटिन्होसाठी रॉब्रेटो फिर्मिनोने संधी तयार केली. मुख्य स्पर्धेत ब्राझीलची सलामी येत्या शनिवारी स्वीत्झर्लंडविरुद्ध होत आहे. गटामध्ये त्यांचे सामने कॉस्टारिका आणि सर्बियाविरुद्ध होणार आहेत. 

Web Title: Neymar shines as Brazil beats Austria in World Cup warmup