आता लक्ष्य रिओ ऑलिंपिक - ऑल्टमन्स

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जुलै 2016

नवी दिल्ली - चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी करताना रौप्यपदक मिळविले. मात्र, आता ही आठवण झाली असून, पूर्ण लक्ष्य रिओ ऑलिंपिकवर केंद्रित करायचे आहे, असे मत भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी व्यक्त केले.

चॅंपियन्स स्पर्धेतील कामगिरी ही अलीकडच्या काळीतील भारतीय हॉकीची सर्वोत्तम अशीच होती. याविषयी ऑल्टमन्स म्हणाले, ‘‘चॅंपियन्स स्पर्धेत पदक मिळविण्याचे आमचे उद्दिष्ट होते. ते आम्ही साध्य केले; पण आता ते जुने झाले. भारतीय खेळाडूंनी आता ती आठवण मनाच्या कप्प्यात ठेवून ऑलिंपिकच्या तयारीला सुरवात करायली हवी.’’ भारतीय हॉकी संघ आता जागतिक क्रमवारीत पाचव्या  क्रमांकापर्यंत येऊन पोचला आहे.