पी. व्ही. सिंधूने पटकाविले सुपर सिरीजचे विजेतेपद

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

फुझोऊ - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूला  आपल्या पहिल्यावहिल्या सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यात यश आले. सिंधूने चीनच्या सून यू हिचा 21-11, 17-21, 21-11 असा पराभव करत चीन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

फुझोऊ - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूला  आपल्या पहिल्यावहिल्या सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यात यश आले. सिंधूने चीनच्या सून यू हिचा 21-11, 17-21, 21-11 असा पराभव करत चीन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

कोरियाच्या सुंग जी ह्यूनचा पराभव करून सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली होती. आज (रविवार) झालेल्या अंतिम लढतीत सिंधूने पहिला गेम 21-11 असा जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही आघाडीवर असताना सूनने जोरदार कमबॅक करत दुसरा गेम 21-17 असा जिंकला. अखेरच्या तिसऱ्या गेममध्ये सिंधून पहिल्यापासून वर्चस्व राखत सूनला संधीच दिली नाही. अखेर सिंधूने तिसऱ्या गेम 21-11 असा जिंकत पहिल्यावहिल्या सुपर सिरीज विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या स्पर्धेसाठी सिंधूला सातवे मानांकन होते. तिने आपल्यापेक्षा एका मानांकनाने सरस असलेल्या ह्यूनवर तीन गेममध्ये ११-२१, २३-२१, २१-१९ अशी उपांत्य फेरीत मात केली होती. रिओ ऑलिंपिकनंतर सिंधूने एखाद्या स्पर्धेचे मिळविलेले हे पहिले विजेतेपद आहे.

क्रीडा

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून अद्याप पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने आगामी भारत...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

दिल्लीचा विजय, तर गुजरातची बरोबरी अहमदाबाद - घरच्या मैदानावर गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सला आपली विजयी मालिका अखेरच्या दिवशी कायम...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल सतत टीका करत असली, तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य चाहते असल्याचे...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017