आता लक्ष्य ऑल इंग्लंड - सिंधू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई - खूप वर्षांपासून मनाशी बाळगलेले सुपर सीरिज विजेतेपदाचे स्वप्न चायना सुपर सीरिज विजेतेपदामुळे साकारले. आता मला ऑल इंग्लंड विजेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे आहे, अशा शब्दांत पी. व्ही. सिंधूने विजेतेपदाचा आनंद व्यक्त केला. आपली विजेतेपदाची भूकही संपली नसल्याचे दाखवले.

मुंबई - खूप वर्षांपासून मनाशी बाळगलेले सुपर सीरिज विजेतेपदाचे स्वप्न चायना सुपर सीरिज विजेतेपदामुळे साकारले. आता मला ऑल इंग्लंड विजेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे आहे, अशा शब्दांत पी. व्ही. सिंधूने विजेतेपदाचा आनंद व्यक्त केला. आपली विजेतेपदाची भूकही संपली नसल्याचे दाखवले.

वरिष्ठ गटात खेळण्यास सुरवात करण्यापूर्वीपासून सुपर सीरिज विजेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगले होते. ऑलिंपिक रौप्यपदकानंतर प्रत्येक जण मला आता काय, असे विचारत होता. त्याचवेळी मी सुपर सीरिज स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले होते. ऑलिंपिक यशानंतर खूप काही बदलले. मला यश मिळण्यास काही महिने लागतील, असेच अनेकांना वाटत होते, असे २१ वर्षीय सिंधूने सांगितले.

काही वर्षांपूर्वी डेन्मार्कला सुपर सीरिजची अंतिम लढत हरल्यानंतर खूपच निराश झाले होते. अखेर आता विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. चाहत्यांना विजेतेपदाचा आनंद मिळण्यासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागली नाही, याचाही आनंद आहे. अर्थात आता सर्व काही साध्य केले असे नव्हे. आता माझे लक्ष्य ऑल इंग्लंड विजेतेपद आहे, असे सिंधूने सांगितले.

अंतिम फेरीतील खेळाबाबत समाधानी आहे. या लढतीतील विजयच अविस्मरणीय आहे. सर्वोत्तम खेळ केला तर काहीही अशक्‍य नाही, याची खात्री होती. 
- पी. व्ही. सिंधू

क्रीडा

श्रीपेरंबुदूर - मुंबईच्या सौरव बंदोपाध्याय याने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील पहिली शर्यत...

09.24 AM

लखनौ - नऊ सामन्यांत अवघा एकच विजय मिळवल्यामुळे प्रो- कबड्डीच्या पाचव्या मोसमात हेलकावे खात असलेल्या तेलुगू टायटन्सला यू मुम्बाने...

09.24 AM

आव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही दाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित...

09.21 AM