PAK vs AUS : सोपा कॅच स्वत:च केला अवघड; व्हिडिओ झाला व्हायरल

Mohammad Rizwan
Mohammad RizwanSakal News

PAK vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानातील पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तान यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) ने एरोन फिंच (Aaron Finch) चा कॅच घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. फिंचन यष्टीमागे एक सोपा झेल दिला होता. पण यावेळी रिझवानची अवस्था मात्र बघण्याजोगी झाली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 15 व्या षटकात महमूदने टाकलेल्या चेंडूवर फिंच फसला. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सावध फटका खेळायला गेला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर निघाला.

बॅटची कड घेऊन चेंडू रिझवानच्या दिशेनं गेला. हा झेल सहज आणि सोपा होता. पण यासाठी रिझवानला चांगलीच कसरत करावी लागली. पाकिस्तानी यष्टीरक्षकाला पहिल्या प्रयत्नात चेंडू पकडता आला नाही. पण त्याने चपळाई दाखवत हातून निसटणारा झेल पुन्हा यशस्वीरित्या पकडला. यासाठी त्याला डाइव्ह मारावी लागली.

Mohammad Rizwan
KL राहुल म्हणाला; आई 26-27 वर्षे खोटं बोलली

जर हा झेल रिझवानने पहिल्या प्रयत्नात घेतला असता तरी याची एवढी चर्चा झाली नसती. पण त्याला जी कसरत करावी लागली त्यामुळे या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते.

Mohammad Rizwan
विराट-अनुष्का जोडीचा सेल्फी 'तिसऱ्या' गोष्टीमुळे चर्चेत

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने डोंगरा एवढी धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. ट्रेविस हेड (Travis Head,) याने 72 चेंडूत 101 धावांची दमदार खेळी केली. यात त्याने 12 चौकार आणि 3 षटकार मारले. फिंचने 36 चेंडूत 23 धावा केल्या. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे सामन्यातील पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने 300 पार करुन पाकिस्तानसमोर मोठी आणि आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com