राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पूजा राज्याची कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पुणे - महिला गटाच्या ६४व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पुण्याच्या पूजा शेलार हिच्याकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. ही  स्पर्धा २७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत बिहार येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात रंगणार आहे. 

पुणे - महिला गटाच्या ६४व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पुण्याच्या पूजा शेलार हिच्याकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. ही  स्पर्धा २७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत बिहार येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात रंगणार आहे. 

या वर्षी प्रथमच पुरुष आणि महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धा स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत. गेल्याच महिन्यात झालेल्या पुरुष गटात महाराष्ट्र संघ उपांत्य फेरीत सेनादलाकडून पराभूत झाला होता. महिला विभागात गेल्या वर्षी महाराष्ट्र संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या वेळी ही कामगिरी उंचावण्याच्याच इराद्यानेच बलवान संघ निवडण्यात आल्याचे राज्य संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. या वर्षी मुंबई उपनगरची सायली जाधव, ठाण्याची चैताली बोऱ्हाडे आणि सांगलीची गौरी पाटील या नवोदितांची प्रथमच वरिष्ठ गटात निवड करण्यात आली आहे.  

संघ - पूजा शेलार (कर्णधार), दीपिका जोसेफ, ललिता घरत, सायली केरिपाळे, सुवर्णा बारटक्के, सायली जाधव, चैताली बोऱ्हाडे, गौरी पाटील, कोमल देवकर, अभिलाषा म्हात्रे, सोनी जायभाय, अपेक्षा टाकळे, प्रशिक्षक दीपक पाटील.

क्रीडा

मुंबई - जागतिक कुस्तीतील निर्णय अधिक अचूक होण्यासाठी मॅटभोवतालच्या कॅमेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. पॅरिसला आजपासून सुरू झालेल्या...

09.09 AM

मुंबई - स्वप्नील धोपाडेने एम. आर. ललित बाबूविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून राष्ट्रीय प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेतील प्रवेश निश्‍चित...

09.09 AM

नवी दिल्ली - पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी पुन्हा एकदा एकाच गटात आले आहेत. भारतात...

09.09 AM