साईनाचा झटपट विजय; पण आव्हान खडतर 

Saina Nehwal
Saina Nehwal

फुझोऊ : साईना नेहवालने चीन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सलामीची लढत झटपट जिंकली; पण तिच्यासमोर दुसऱ्या फेरीत खडतर आव्हान असेल. 

राष्ट्रीय विजेत्या साईनाने अमेरिकेच्या बेईवेन झॅंग हिला 21-12, 21-13 असे अर्ध्या तासात सहज हरवले. जागतिक क्रमवारीत अकरावी असलेल्या साईनाची आता लढत पाचव्या मानांकित अकेन यामागूची हिच्याविरुद्ध होईल. साईनाने या जपानच्या प्रतिस्पर्धीविरुद्ध यंदाच्या तीनही लढती गमावल्या आहेत; मात्र त्यापूर्वीच्या लढतीतील विजयच साईनास दिलासा देत आहे. लीन दान पहिल्याच फेरीत पराजित झाला. इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीने त्याला दोन गेममध्येच हरवले. 

सौरभ वर्मा पहिल्याच फेरीत पराजित झाला. त्याला फ्रान्सच्या ब्राईस लेवेर्देझ याच्याविरुद्ध 14-21, 21-15, 11-21 अशी हार पत्करावी लागली. सात्विकराज रांकीरेड्डी-चिराग शेट्टी सलामीला चीनच्या जोडीला लढतही देऊ शकले नाहीत. अश्‍विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी यांना कोरियाच्या जोडीला माफक आव्हान दिल्याचेच समाधान लाभले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com