साईना, सिंधूवरच भारताची मदार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

बर्मिंगहॅम - बॅडमिंटन जगतातील विंबल्डन समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेकडे आता सर्वांचे लक्ष लागणार आहे. या स्पर्धेत साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावरच भारताची मदार असेल. सिंधूने ऑलिंपिक रौप्यपदक जिंकल्यानंतर ऑल इंग्लंड विजेतेपद हे आपले महत्त्वाचे लक्ष्य असल्याचे सांगितले होते.

प्रकाश पदुकोण (1980) आणि पुल्लेला गोपीचंद (2001) या भारतीयांनीच ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. साईनाला 2015 च्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. भारतीय बॅडमिंटनची पहिली फुलराणी असलेल्या साईनाने यंदा या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीचे लक्ष्य बाळगले असेल. आठव्या मानांकित साईनासमोर सलामीला जपानच्या नाझोमी ओकुहारा हिचे आव्हान असेल. ओकुहारा गतविजेती आहे, पण खांद्याच्या दुखापतीमुळे तिने ब्रेक घेतला आहे. बर्कलेयार्ड एरिनात होणाऱ्या या स्पर्धेत सिंधू गतवर्षी सलामीलाच पराजित झाली होती. यंदाच्या सुप सीरिज स्पर्धेतील यशामुळे सिंधूचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. सहावी मानांकित सिंधू सलामीला डेन्मार्कच्या मेत्ते पौलसेनविरुद्ध खेळणार आहे. तिच्यासमोर उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ताई झू यिंग हचे आव्हान असेल. ही अन्य सुपर सीरिज स्पर्धांसारखीच स्पर्धा आहे असे सांगत स्वतःवरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुरुष एकेरीत रिओ ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठलेला किदांबी श्रीकांत, स्वीस ओपन विजेता एच. एस. प्रणॉय तसेच डच ओपन विजेता अजय जयराम हे पुरुष एकेरीत लक्षवेधक कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील.