समीर वर्माची सनसनाटी सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नवी दिल्ली - भारताच्या समीर वर्मा याने इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी सनसनाटी सुरवात केली. त्याने पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सोन वॅन हो याचा २१-१७, २१-१० असा पराभव केला.

नवी दिल्ली - भारताच्या समीर वर्मा याने इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी सनसनाटी सुरवात केली. त्याने पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सोन वॅन हो याचा २१-१७, २१-१० असा पराभव केला.

पहिल्या गेममध्ये चुरशीचा खेळ झाला. वॅनने पहिला गुण मिळविला. पण, त्यानंतर समीरने प्रतिआक्रमण करत त्याला तोडीस तोड उत्तर दिले. गेमच्या मध्याला समीर १०-११ असा मागे होता. अंतिम टप्प्यात १७-१७ अशी बरोबरी असताना समीरने सलग चार गुणांची कमाई करून पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेमला समीरला सुरवातीलाच लय सापडली. पहिल्या गुणापासून मिळविलेली आघाडी त्याने भक्कम केली. त्याला प्रतिहल्ल्याची संधी न देता दुसरी गेम जिंकली. 

अन्य प्रमुख निकाल ः 
महिला - रितुपर्णा दास वि.वि. चिआंग मेई हुई (तैवान) १९-२१, २१-१५, २१-१९, साईना नेहवाल वि.वि. चिआ सिन ली (तैवान) २१-१०, २१-१७, पी. सी. तुलसी पराभूत वि. अकाने यामागूची १५-२१, १६-२१, अनुराधा प्रभुदेसाई पराभूत वि. सायाका साटो १७-२१, १६-२१, पी. व्ही. सिंधू वि. वि. अरुंधती पानतावणे २१-१७, २१-६.  

पुरुष - सौरभ वर्मा वि.वि. एच. एस. प्रणॉय २१-१३, २१-१६, अजय जयराम पराभूत वि. व्हिक्‍टर ॲलेक्‍सेन २१-२३, १७-२१. बी. साईप्रणीत  वि. वि. केंटा निशिमोतो १६-२१, २१-१२, २१-१९

Web Title: Sensational start of Sameer Verma