शेनझेन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत हरिकृष्णने स्विडलरला रोखले

पीटीआय
शुक्रवार, 24 मार्च 2017

शेनझेन (चीन) - भारताचा ग्रॅंडमास्टर पी. हरिकृष्ण याने शेनझेन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला झकास सुरवात केली. पहिल्या फेरीत त्याने रशियाच्या पीटर स्विडलरला बरोबरीत रोखले. जागतिक क्रमवारीत २५७८ एलो गुणांकनासह १४व्या स्थानी असलेल्या हरिकृष्णाने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना आक्रमक सुरवात केली. त्याच्या या धोरणामुळे स्विडलर चकित झाला. अनुभवाच्या जोरावर जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानावर असणाऱ्या स्विडलरने खुबीने त्याला प्रत्युत्तर देत आपला बचाव भक्कम राखला. दोन्ही खेळाडू एकवेळ वेळेच्या दडपणाखाली आले. अखेरीस ३०व्या चालीनंतरच त्यांनी बरोबरी राखण्याला प्राधान्य दिले.

शेनझेन (चीन) - भारताचा ग्रॅंडमास्टर पी. हरिकृष्ण याने शेनझेन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला झकास सुरवात केली. पहिल्या फेरीत त्याने रशियाच्या पीटर स्विडलरला बरोबरीत रोखले. जागतिक क्रमवारीत २५७८ एलो गुणांकनासह १४व्या स्थानी असलेल्या हरिकृष्णाने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना आक्रमक सुरवात केली. त्याच्या या धोरणामुळे स्विडलर चकित झाला. अनुभवाच्या जोरावर जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानावर असणाऱ्या स्विडलरने खुबीने त्याला प्रत्युत्तर देत आपला बचाव भक्कम राखला. दोन्ही खेळाडू एकवेळ वेळेच्या दडपणाखाली आले. अखेरीस ३०व्या चालीनंतरच त्यांनी बरोबरी राखण्याला प्राधान्य दिले. पहिल्या फेरीनंतर हरिकृष्णा तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेत अन्य पाच ग्रॅंडमास्टर खेळत असून, प्रत्येक जण एकमेकांशी दोनवेळा खेळणार आहे.

Web Title: Shenzhen Masters chess tournament