भारताच्या अन्नू राणी, शिवपालला सुवर्ण

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

बुडापेस्ट (हंगेरी) :  राष्ट्रीय विक्रम नोंदविणाऱ्या अन्नू राणी आणि शिवपाल सिंग यांनी बुडापेस्ट ओपन स्पर्धेत रविवारी भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
महिला गटात अन्नू राणी हिने 57.24 मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताच्याच सॅफ क्रीडा स्पर्धा विजेती सुमन देवी हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने 55.38 मीटर भाला फेकला. पुरुष गटातही भारताने सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविले. शिवपालने 76.74 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याचा सहकारी रजिंदरसिंग रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

पुरुष रिले चमूला सुवर्ण
किरगिझस्तानमध्ये शिश्‍केक येथे आजच झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या 4 बाय 100 रिले संघाने सुवर्णपदक पटकावले. याच शर्यतीत महिला विभागात भारतीय संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत द्युती चंदने रौप्यपदक मिळविले.
रिले शर्यतीत पुरुष संघाने 39.92 सेकंद अशी वेळ दिली. महिला संघ 44.45 सेकंदासह दुसऱ्या स्थानावर राहिला. शंभर मीटर शर्यतीत द्युती दुसरी आली. तिने 11.47 सेकंद वेळ दिली. पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत अमिया मलिक 10.84 सेकंदासह पाचव्या स्थानावर राहिला.