अमेरिकन ओपनचे स्लोआनी स्टीफन्सला जेतेपद

वृत्तसंस्था
रविवार, 10 सप्टेंबर 2017

स्लोआनीला या स्पर्धेच्या विजेतेपदामुळे 3.7 मिलियन अमेरिकन डॉलर एवढी रक्कम मिळाली आहे. तिच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वोच्च रक्कम आहे. मी हे विजेतेपद मिळवेल असा विचारही केला नव्हता. गेल्या सहा आठवड्यापूर्वी मी पुनरागमन केले होते. आता मला निवृत्त व्हावे, असे वाटत असल्याचे स्लोआनीने सांगितले.

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सने प्रथमच कारकिर्दीत ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली आहे. स्लोआनीने यूएस ओपन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले. 

स्लोआनीने अमेरिकेच्याच मॅडीसन कीजला 6-3, 6-0 असे सहज दोन सेटमध्ये पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. जुलैमध्ये दुखापतीतून सावरत स्लोआनीने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते. स्लोआनीला या स्पर्धेसाठी नामांकनही देण्यात आले नव्हते. नामांकन नसतानाही ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारी स्लोआमी ही पाचवी महिला खेळाडू ठरली आहे. 

स्लोआनीला या स्पर्धेच्या विजेतेपदामुळे 3.7 मिलियन अमेरिकन डॉलर एवढी रक्कम मिळाली आहे. तिच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वोच्च रक्कम आहे. मी हे विजेतेपद मिळवेल असा विचारही केला नव्हता. गेल्या सहा आठवड्यापूर्वी मी पुनरागमन केले होते. आता मला निवृत्त व्हावे, असे वाटत असल्याचे स्लोआनीने सांगितले. स्लोआनीने गेल्या 17 सामन्यांमध्ये 15 सामन्यांत विजय मिळविला आहे.