आम्ही सर्वोत्तम कामगिरी बजावू - अमरजित

पीटीआय
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पणजी - भारतीय संघ १७ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी बजावेल, असा विश्वास यजमान कर्णधार अमरजितसिंग कियाम याने व्यक्त केला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील २१ सदस्यीय भारतीय संघ सहा ऑक्‍टोबर रोजी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर अमेरिकेविरुद्धच्या लढतीने मोहिमेस सुरवात करणार आहे.

दिल्लीस रवाना होण्यापूर्वी सोमवारी संध्याकाळी भारतीय संघाने फातोर्डा-मडगाव येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक लुईस नॉर्टन द मातोसही उपस्थित होते.

स्पर्धेसाठी तयारी करताना आम्हाला भरपूर सहकार्य लाभले, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. स्पर्धेत खेळताना आम्ही शंभर टक्के योगदान देऊ, असे अमरजित म्हणाला. संघातील सर्व खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा सामना करताना आम्हाला अजिबात भीती वाटत नसल्याचेही मणिपूरच्या या युवा मध्यरक्षकाने नमूद केले. अमेरिकेव्यतिरिक्त कोलंबिया आणि घाना हे भारताच्या ‘अ’ गटातील अन्य प्रतिस्पर्धी आहेत.विश्वकरंडक स्पर्धेत खेळणारा भारताचा युवा संघ देशातील फुटबॉलसाठी प्रेरणास्रोत आहे, असे मत प्रशिक्षक मातोस यांनी व्यक्त केले.