मरे विंबल्डनसाठी तंदुरुस्त

पीटीआय
सोमवार, 3 जुलै 2017

लंडन - कमरेच्या दुखापतीमुळे विंबल्डनपूर्व सराव स्पर्धेत अपयशी ठरलेला गतविजेता अँडी मरे तंदुरुस्त झाला असून, विजेतेपद टिकविण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत, असे त्यानेच रविवारी सांगितले. एका स्पर्धेतील पहिल्याच फेरीत झालेला पराभव आणि दुसऱ्या स्पर्धेतून माघार, यामुळे मरेच्या विंबल्डन सहभागाविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगात आल्या होत्या. मात्र, आज तो विंबल्डनमध्ये सराव करताना दिसल्यावर या चर्चेला पूर्णविराम दिला. सरावानंतर त्यानेच आपण तंदुरुस्त असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘‘मी शंभर टक्के तंदुरुस्त आहे.

लंडन - कमरेच्या दुखापतीमुळे विंबल्डनपूर्व सराव स्पर्धेत अपयशी ठरलेला गतविजेता अँडी मरे तंदुरुस्त झाला असून, विजेतेपद टिकविण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत, असे त्यानेच रविवारी सांगितले. एका स्पर्धेतील पहिल्याच फेरीत झालेला पराभव आणि दुसऱ्या स्पर्धेतून माघार, यामुळे मरेच्या विंबल्डन सहभागाविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगात आल्या होत्या. मात्र, आज तो विंबल्डनमध्ये सराव करताना दिसल्यावर या चर्चेला पूर्णविराम दिला. सरावानंतर त्यानेच आपण तंदुरुस्त असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘‘मी शंभर टक्के तंदुरुस्त आहे. स्पर्धेत आम्ही सात सामने खेळणार आहे.’’ या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सेंटर कोर्टवर त्याची गाठ कझाकिस्तानच्या ॲलेक्‍झांडर बब्लिकशी पडणार आहे.