सामिया फारुकीस विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई - सामिया फारुकीने आशियाई कुमार बॅडमिंटन स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलींच्या एकेरीत विजेतेपद जिंकले. त्याचबरोबर भारताने म्यानमारमध्ये झालेल्या या स्पर्धेत तीन ब्राँझपदकेही जिंकली.

मुंबई - सामिया फारुकीने आशियाई कुमार बॅडमिंटन स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलींच्या एकेरीत विजेतेपद जिंकले. त्याचबरोबर भारताने म्यानमारमध्ये झालेल्या या स्पर्धेत तीन ब्राँझपदकेही जिंकली.

हैदराबादच्या सामियाने याँगॉन येथे झालेल्या स्पर्धेतील निर्णायक लढतीत इंडोनेशियाच्या विदजॅजा स्टेफानी हिला पहिला गेम गमावल्यावर हरवले. सामियाने निर्णायक लढतीत १५-२१, २१-१७, २१-१९ असा विजय मिळविला. सूर गवसण्यापूर्वी सामियाने पहिला गेम गमावला होता. दुसऱ्या गेमपासून तिने आक्रमक सुरवात केली. ब्रेकमुळे तिची लय काहीशी हरपली; पण तिने वेळीच सावरत बाजी मारली. निर्णायक गेममध्ये सतत पारडे बदलत होते. तिने ७-११ पिछाडीनंतर सलग पाच गुण जिंकले. त्यानंतरही आघाडी बदलत होती. १७-१७ बरोबरीनंतर सामियाने संधीचा जास्त फायदा घेतला आणि बाजी मारली. 

या स्पर्धेत आशी रावत (१५ वर्षांखालील मुली), केयूरा मोपाती-कविब्रिया सेल्वम (१७ वर्षांखालील मुली दुहेरी) आणि आयुषराज गुप्ता-शुभम पटेल (१५ वर्षांखालील मुले दुहेरी) यांनीही पदक जिंकले.

यापूर्वीचे कुमार विजेते
पी. व्ही. सिंधू (२०१२) - १९ वर्षांखालील मुली एकेरी
सीरिल वर्मा (२०१३) - १५ वर्षांखालील मुले एकेरी.
चिराग शेट्टी - एम. आर. अर्जुन (२०१३)  सतरा वर्षांखालील दुहेरी.
सात्विकराज रंकीरेड्डी-कृष्णा प्रसाद(२०१५) सतरा वर्षांखालील कुमार दुहेरी.